अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; जावई ठार तर सासरा गंभीर

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी नजीकच्या उमरी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जावई ठार तर सासरा गंभीर जखमी झाल्याची घटना accident गुरुवारच्या रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. देविदास प्रल्हाद फुलझले (39) रा. जामगिरी असे मृतक जावयाचे तर कालिदास उराडे (58) रा. वायगाव हे गंभीर जखमी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आष्टी येथे बाजार करण्यासाठी जामगिरी येथील देविदास फुलझेले व वायगाव येथील त्यांचे सासरे कालिदास उराडे आले होते. बाजार करून ते सायंकाळच्या सुमारास एमएच 33 एल 4396 क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे जायला निघाले. दरम्यान, उमरी गावाजवळ पोहोचताच त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात जावई देविदास फुलझेले हे जागीच ठार झाले. तर सासरा कालिदास उराडे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतकास व जखमीस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी कालिदासला प्राथमिक उपचारानंतर रेफर करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अजय राठोड करीत आहेत.