‘सर्च’मध्ये ह्रदय रुग्णांसाठी सुविधा ; तज्ञांकडून होणार उपचार

सर्च’मध्ये ह्रदय रुग्णांसाठी सुविधा ; तज्ञांकडून होणार उपचार

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात नागपूर येथील ‘अवंती’ रुग्णालयाच्या सहकार्याने नियमित ह्रदयरोग ओपीडी सुरु झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी ही ओपीडी असणार असून १० जून ला शनिवारला सर्च रुग्णालयात हृदयरोग ओपीडी घेण्यात येणार आहे. यात हृदयरोगतज्ञ डॉ. उदय माहोरकर व सहकारी डॉक्टरांची टीम रुग्णांची तपासणी करणार आहेत.
ह्रदयरोग असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, व्यायामाचा अभाव, तणावपूर्ण आयुष्य, धुम्रपान, तंबाखू, गुटखा यांसारखे व्यसन अशा कारणांमुळे हृदयविकार वाढत आहेत. जन्मजात हृदयाला छिद्र असते, त्याला हार्ट डिसीज म्हणतात. त्याबरोबरच हार्ट अटॅकमुळे होणार्‍या मृत्युचे प्रमाण देखील वाढले आहे. हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिनीत रक्तपुरवठा बंद पडणे.
काळाची गरज समजून आणि रुग्णामधील गुंतागुंतीच्या वाढत्या प्रवृत्तीचा विचार करून चातगाव येथील सर्च रुग्णालयात हृदयरोग ओपीडीला सुरुवात करण्यात आली आहे.  ह्रदयरोगाचे निदान करण्यासाठी शारीरिक तपासणी सोबतच (२डी इको व टी.एम.टी) तपासण्या केल्या जातील. तरी या ओपीडीचा लाभ रुग्णांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.