सुशिक्षित बेरोजगारांसाठी ‘मत्स्यपालन’ प्रशिक्षण ; इच्छुकांनी आरसेटी कार्यालयाशी संपर्क साधावा

सुशिक्षित बेरोजगारांसाठी ‘मत्स्यपालन’ प्रशिक्षण ; इच्छुकांनी आरसेटी कार्यालयाशी संपर्क साधावा
GADCHIROLI TODAY

गडचिरोली : भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय व बँक ऑफ इंडिया आरसेटी यांच्या विद्यमाने ‘मत्स्यपालन’ या व्यवसायासाठीच्या दहा दिवसाचे निवासी मोफत प्रशिक्षण बीओआय- आरसेटी संस्था कार्यालयात आयोजीत करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून प्रशिक्षणादरम्यान राहणे, जेवण, चहा, नाश्ता या सोयी विनामुल्य पुरविल्या जातील. प्रशिक्षणाचा कालावधी १९ ते २८ जुन राहिल. या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ओरीजनल आधार कार्ड, पॅन कार्ड, टीसी, मार्कशिट, बीपीएल दाखला, स्वयंसहायता गटाचे सभासद असल्याचे प्रमाणपत्र, रोजगार हमी जाब कार्ड [असल्यास], पासपोर्ट आकाराचे 4 फोटो अर्जासोबत सादर करावे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला बीओआय-आरसेटीच्या संस्था कार्यालयात (07132-295040) किंवा कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम 9404188239 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.