उद्या देसाईगंजात दमा रुग्णांना औषध वितरण ; राज्यासह परराज्यातील रुग्ण लावणार हजेरी

GADCHIROLI TODAY

देसाईगंज : गेल्या चार दशकांपासून जिल्ह्यातल्या देसाईगंज तालुक्यातील कोकडी या गावचे वैद्यराज प्रल्हाद सोमाजी कावळे मृग नक्षत्राच्या दिवशी मासोळीतून दमा औषधी देतात. यंदा गुरुवार, 8 जुन ते 9 जुन सकाळी 6 वाजेपर्यंत दमा रुग्णांना औषधी वितरीत होणार आहे.
देसाईगंज येथील सिरोंचा-साकोली या राष्ट्रीय महामार्गांच्या बाजूला असणाऱ्या आदर्श इंग्लिश हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणावर दमा औषध वाटप केले जाणार आहे. याप्रसंगी खा. अशोक नेते यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. यासोबतच आ. कृष्णा गजबे, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील, राज्यातील आणि राज्याबाहेरील हजारो दमा रुग्ण आणि रुग्ण नातेवाईक येत असल्याने त्यांच्या आगमन, निर्गमनाच्या दृष्टीने नियोजन केले आहे. या कार्यक्रमाला हजारो रुग्ण, नातेवाईक, नागरीक येत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देसाईगंज पोलीस प्रशासन सांभाळणार आहे.