अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीस एलसीबीने केली अटक ; रेखाचित्र काढून लावला शोध

अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीस एलसीबीने केली अटक ; रेखाचित्र काढून लावला शोध
– चंद्रपूरातुन अटक
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : एका महिलेवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला पीडितेच्या तक्रारीवरुन गडचिरोलीच्या एलसीबी पथकाने कुठलेही धागेदोरे नसताना मोठ्या शिताफिने चंद्रपूरात सापळा रचून बुधवारला अटक केली. विशेष म्हणजे, पोलिसांनी पिढीतेच्या माहितीवरून रेखाचित्र काढून आरोपीचा शोध लावला. मिथून मडावी ता. चामोर्शी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, 27 मे रोजी सायंकाळी 5 वाजता पीडित महिला ही आपले काम आटोवून निर्जन रस्त्याने घराकडे जात होती. दरम्यान, आरोपी मिथून मडावी याने निर्जन रस्त्याचा फायदा घेतला पीडितेला थांबवून जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध केला असता, आरोपीने तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. घटनेसंदर्भात पीडितेने चामोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चामोर्शी पोलिसांनी पीडितेला उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवली. एलसीबीच्या पथकाने तपासासाठी चार पथके गठीत करून तपास सुरु केला. एलसीबीच्या महिला अधिकारी सपोनि रुपाली पाटील यांनी पीडितेची रुग्णालयात भेट घेवून विचारपूस केल असता, पीडितेवर मानसिक आघात झाल्याने ती संपूर्ण माहिती देवू शकत नव्हती. त्यामुळे पीडितेला सखी वनस्टॉप सेंटर येथील समुपदेशकांच्या मदतीने विश्वासात घेवून बोलते केले. पीडितेच्या माहितीवरून आरोपीचे रेखाचित्र काढण्यात आले. रेखाचित्रावरून आरोपीची परिसरात विचारपूस केली असता, घटनेच्या दिवशीपासून मिथून मडावी हा फरार असून त्याचे वर्णन रेखाचित्राशी मिळतेजुळते असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात कोणतेही धागेदोरे नसतानाही एलसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफिने आरोपीला अटक केल्याने पथकाचे कौतुक होत आहेत. आरोपीस पुढील कारवाईकरीता तपासी अधिकारी महिला पोलिस उपनिरीक्षक पल्लवी वाघ पोस्टे चामोर्शी यांच्या ताब्यात देण्यात आले.
चंद्रपूर शहरातून केली अटक
संयशीत आरोपीचा भाऊ चंद्रपूर येथे राहत असल्याने चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांशी संपर्क साधण्यात आला. प्रकरणाची माहिती दिल्यानंतर चंद्रपूरच्या एलसीबी पथकाने तपास सुरु केला. दरम्यान, संशयीत आरोपी चंद्रपूर येथेच असल्याची माहिती मिळताच, सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. त्याला गडचिरोली येथे आणून विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
यशस्वी कारवाई करणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी
सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोनि उल्हास भुसारी व चामोर्शी पोस्टेचे पोनि विजयानंद पाटील यांच्या नेतृत्वात सपोनि रुपाली पाटील, पोउपनि राहूल आव्हाड, दीपक कुंभारे, पल्लवी वाघ, सुधीर साठे, पुरुषोत्त वाटगुरे, पोना दीपक लेनगुरे, पोशि श्रीकांत बोईना, सचिन घुबडे, पोना अकबर पोयाम, पोशि प्रशांत गरफडे, श्रीकृष्ण परचाके, चापोना शगीर शेख, मनोहर टोगरवार, माणिक निसार यांनी पार पाडली.