‘सर्च’ रुग्णालयात सिकलसेल ओपीडी ; तज्ञांकडून रुग्णांवर उपचार 

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात आय.सी.एम.आर सिकलसेल टीम चंद्रपुर व सर्चच्या सहकार्याने सिकलसेल ओपीडीचे नियोजन करण्यात आले आहे. या महिन्याला १४ जून रोज बुधवारला ही ओपीडी घेण्यात येणार असून डॉ. कल्पिता गावित व टीम रुग्णांची तपासणी करणार आहेत .
सिकलसेल आजार हा अंनुवांशिक आजार आहे. यात आई व वडील दोघेही सिकलसेल रुग्ण किवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्याना हा आजार होऊ शकतो. आजाराची माहिती, लक्षणे व रुग्णांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन तसेच सिकलसेल आजारा संबंधित होणार्‍या प्रयोगशाळा तपासणी, औषधोपचार मोफत होतील. Folic acid, Hydroxyurea आणि इतर आवश्यक औषधी मोफत दिल्या जाईल. काळाची गरज समजून चातगाव येथील ‘सर्च’ रुग्णालयात सिकलसेल ओपीडी ला सुरुवात करण्यात आली आहे. सदर रुग्णालयात १२ जुलै, १६ ऑगस्ट, १३ सप्टेंबर, १८ ऑक्टोबर, १५ नोव्हेंबर आणि १३ डिसेंबर या तारखेला पुढील सिकलसेल ओपीडीचे नियोजन केले आहे. सिकलसेल आजाराने त्रस्त असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा असे आवाहन ‘सर्च ‘कडून करण्यात येत आहे.