अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींची कारागृहात रवानगी

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : आदिवासी अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना 14 जून रोजी गडचिरोली येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना जामीन नामंजूर करीत त्यांची कारागृहात रवानगी केली आहे.
एटापल्ली तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन विद्यार्थी आलापल्ली येथील शाळेतून दहावीच्या निकालाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आली असता तिच्यावर रोशन गोडसेलवार व निहाल कुंभारे या दोन युवकांनी अत्याचार केला होता. यासंबंधीची तक्रारी पीडित अल्पवयीन विद्यार्थीनीने एटापल्ली पोलिस ठाण्यात दिली होती. एटापल्ली पोलिसांनी सदर प्रकरण अहेरी पोलिसांकडे वर्ग केले असता अहेरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना रविवारी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना पुन्हा गडचिरोली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन नामंजूर करीत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावीत आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे.