अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

GADCHIROLI TODAY
देसाईगंज : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू तर दुसरा जखमी झाल्याची घटना देसाईगंज-कुरखेडा मार्गावर आज दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास घडली. हिराकांत नेवारे (24) असे मृतकाचे तर रवी कांबळी (32) दोन्ही रा. विसोरा असे जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, देसाईगंज शहरातील कुरखेडा मार्गावर नेवारे व कांबळी हे दुचाकीने प्रवास करीत होते. दरम्यान, अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीचालक नेवारे याचा जागीच मृत्यू झाला तर कांबळी हा जखमी झाला. अपघातानंतर जखमीवर प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे रेफर करण्यात आले. अपघात घडताच अज्ञात वाहनचालक वाहन घेवून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.