अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण प्रकरण ; आरोपींना दोन दिवसाची पोलिस कोठडी

अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण प्रकरण ; आरोपींना दोन दिवसाची पोलिस कोठडी

GADCHIROLI TODAY
देसाईगंज : शहरातील एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी दोन शिक्षकासह एका न्यायालयीन कर्मचाऱ्यास देसाईगंज पोलिसांनी अटक केली होती. प्रारंभी पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर कालावधी संपताच गुरुवारी आरोपींना परत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना आणखी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अक्षय दादाजी रामटेके, पवन दादाजी रामटेके दोघेही रा. तुळसी व भूपेश मोहनलाल कनौजिया रा. देसाईगंज अशी आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, तीन आरोपीतील एका आरोपीची पीडित मुलासोबत ओळखी होती. संबंधित आरोपीद्वारे सदर पीडित युवकाचे सातत्याने लैंगिक शोषण केले जात होते. यासोबतच अन्य दोन्ही आरोपीही पीडिताचे लैंगिक शोषण करु लागले. याची तक्रार पीडित अल्पवयीन मुलाने देसाईगंज पोलिस ठाण्यात दाखल केली. तक्रार प्राप्त होताच देसाईगंज पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. प्रारंभी आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान मुदत संपल्याने गुरुवारी तिन्ही आरोपींना परत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना आणखी दोन दिवस पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे. पुढील तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत.