राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी भैरवी व देवांगची निवड

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी भैरवी व देवांगची निवड
-रोहतकमध्ये होणार स्पर्धा

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्ह्यातील भैरवी भरडकर व देवांग महागनकर यांची हरियाणा राज्यातील रोहतक जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
चंद्रपूर येथे पार पडलेल्या नॅशनल सिलेक्शन ट्रायलमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील भैरवी भरडकर व देवांग महागनकर यांनी 52 किलो वजन गटात उत्कृष्ठ प्रदर्शन करत विजय मिळविला आहे. यामुळे दोघांचीही निवड राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे. रोहतकमध्ये होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल स्पर्धक व प्रशिक्षकांचे गडचिरोली बॉक्सिंग संघटनेकडून, बॉक्सिंग परिवाराकडून अभिनंदन केले जात असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.