अपहरण प्रकरण ; गडचिरोली पोलिसांनी आणखी तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

अपहरण प्रकरण ; गडचिरोली पोलिसांनी आणखी तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : काही युवकांनी शहरापासून जवळच असलेल्या मुडझा येथील एका युवकाचे अपहरण करुन मारहाण केली होती. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली होती. दरम्यान या प्रकरणी आणखी तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुडझा येथील समीर चौधरी य युवकासोबत कुनघाडा येथील आरोपी अल्पवयीन मुलाचा जुना वाद होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास जुन्या वादातून दोघांमध्ये मोबाईलवरुन बाचाबाची झाली. दरम्यान अल्पवयीन मुलाने आपल्या काही मित्रांना सोबत घेत रात्रीच वाहनाने थेट मुडझा हे गाव गाठले. गावात पोहचताच आरोपींनी समीर चौधरी यास वाहनात टाकून अपहरण केले. त्यानंतर त्याला मारहाण करीत परत गावात आणून सोडले. दरम्यान गावातील नागरिकांनी आरडाओरड करताच यातील काही आरोपी पळून गेले, तर दोन अल्पवयीन आरोपींना पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. याची तक्रार गडचिरोली पोलिसांना देताच अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली. यातील फरार आरोपींचा पोलिसांद्वारे शोध सुरु असतांना आज, शनिवारी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गडचिरोली पोलिसांनी आज, सायंकाळी उशिरा पाचही आरोपींना न्यायालयात हजर केल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन तोटेवार करीत आहेत.
अटकेतील आरोपींची संख्या पाच
गडचिरोली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये राजेंद्र ऊर्फ गोलू सपन मंडल रा. कुनघाडा, नकुल भोयर रा. चामोर्शी, मुस्तफा पठाण रा. कुनघाडा यांचेसह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.