‘क’ शिटसाठी केली लाचेची मागणी ; आरमोरी भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक अडकला जाळ्यात

‘क’ शिटसाठी केली लाचेची मागणी ; आरमोरी भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक अडकला जाळ्यात

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : तक्रारदार यांच्या वडिलोपर्जित शेत जमिनीच्या पोट हिस्साची मोजणी करून त्यातील एक हेक्टर जमीन मॅचअप करून ‘क’ शिट तयार करून देण्याच्या कामाकरिता ७ हजारांच्या लाचेची मागणी करणारा आरमोरी भूमी अभिलेख कार्यालयातील भुकरमापक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई २६ जून रोजी करण्यात आली असून याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुशाल मुखरूजी राखडे (३९) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार यांना त्यांच्या वडिलोपर्जित शेत जमिनीची मॅचअप करून ‘क’ शिट तयार करून देण्याच्या कामाकरिता उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आरमोरी येथील भूकरमापक राखडे यांनी ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीच्या अनुषंगाने सापळा कारवाई दरम्यान पंचसाक्षीदारासमक्ष भूकरमापक रोखडे यांनी सुस्पष्ट लाच रकमेची मागणी केली. याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई लाप्रवी पोलीस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, पोनि श्रीधर भोसले, पोहवा नथ्थु धोटे, पोना राजू पदमगीरवार, किशोर जौंजारकर, स्वप्नील बांबोळे, पोशि किशोर ठाकूर, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, चापोहवा अनिल अंगडवार यांनी केली.