सतर्कतेचा ईशारा, वैनगंगा नदीतील विसर्ग वाढल्याने नदी पात्रात जाऊ नये : तहसीलदार ओमप्रकाश गोंड

सतर्कतेचा ईशारा, वैनगंगा नदीतील विसर्ग वाढल्याने नदी पात्रात जाऊ नये : तहसीलदार ओमप्रकाश गोंड

GADCHIROLI TODAY
चामोर्शी : जवळील वैनगंगा नदीच्या तीरावर बांधण्यात आलेल्या चीचडोह बॅरेजचे चार दरवाजे आज २९ जून रोजी उघडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पात्रात वाढ होणार असून नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांनी केले आहे
सध्या पावसाळा सुरू झाला असल्यामुळे प्रथमच वैनगंगा नदीवर असलेल्या चीचडोह बॅरेजचे दोन दरवाजे २९ जून रोजी सकाळी ८ वाजता उघडल्याने वैनगंगा नदीतील विसर्ग वाढ होत आहे. तसेच गोसीखुर्द धरणातून वाढता विसर्ग लक्षात घेता आज 29 जून रोजी दुपारी 12.30 वाजता अजून दोन गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत चिचडोह प्रकल्पाच्या एकूण 4 गेट मधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व नागरिकांनी अनुचित धोका टाळण्यासाठी मासेमारी, मार्कडा देवस्थानी धार्मिक विधी, स्नान आदीसाठी नदी पात्रात जाऊ नये. असे आवाहन तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांनी केले आहे