गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून दुचाकीसह हजारोंची दारू केली जप्त :एका तस्करास अटक

गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून दुचाकीसह हजारोंची दारू केली जप्त : एका तस्करास अटक

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातून शहरातील गोकूलनगरात दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळताच गडचिरोली पोलिस स्टेशनच्या डीबी पथकाने चंद्रपूर मार्गावरील मारुती सुजूकी शो-रूम जवळ सापळा रचून 28 हजार रूपये किमतीची देशी दारू व 65 हजार रूपये किंमतीची दुचाकी असा एकूण 93 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास केली. याप्रकरणी गोकुलनगर येथील गुलबाहर डिबु ठाकुर (22) या दारू तस्करास अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातून शहरातील गोकूलनगरात दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळताच गडचिरोली पोलिस स्टेशनच्या डीबी पथकाने चंद्रपूर मार्गावरील मारुती सुजूकी शो-रूम जवळ सापळा रचला. दरम्यान, एम. एच. 33 एएफ-1828 क्रमांकाची दुचाकी संशयितरित्या निदर्शनास आली. पथकाने दुचाकी चालकास थांबवून झडती घेतली असता, जवळपास 400 नग देशी दारू मिळून आली. याप्रकरणी दुचाकीसह दारू जप्त करीत दारू तस्करास अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे धनंजय चौधरी, तुषार खोब्रागडे, योगेश कोडवते व वृषाली चव्हाण यांनी केली.