गडचिरोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन करू : माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी

गडचिरोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन करू : माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : सद्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेते सत्येमध्ये मस्त तर जनता दुष्काळामुळे त्रस्त आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन उभारण्याचा इशारा माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डाॅ. नामदेव उसेंडी यांनी दिला आहे.
गडचिरोली जिल्हयामध्ये शेतक-यांनी दरवर्षी प्रमाणे जुन महिण्यामध्ये पेरणी केली. परंतु, पाऊस न आल्याने केलेली पेरणी वाया गेलेली आहे. तसेच बियाणे व खताचा सुद्धा फार मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकरी चिंतातुर असून याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. सद्या महाराष्ट्रात सिध्दांतहिन विचारहीन, स्वार्थी सत्तेसाठी हपापलेली राजकारणात नेते मंडळी मस्त आहेत. परंतु महाराष्ट्रातील जनता कोरडा दुष्काळाने त्रस्त आहे. या बाबींचा विचार करुन लवकरात लवकर शेतक-यांना कोरडा दुष्काळ जाहिर करुन एकरी 15 हजार रुपये मदत करावी व तात्काळ बि-बियाणे, खते शेतक-यांना मोफत पुरवण्यात यावी. अन्यथा काॅग्रेस पक्षातर्फे आंदोलन करुन मंत्र्यांना घेराव करण्यात येईल. असा निर्वाणीचा इशारा माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डाॅ. नामदेव उसेंडी यांनी महाराष्ट्रातील जुगाडू सरकारला दिलेला आहे.