पेन्शनसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक ; जिपवर दिली धडक

पेन्शनसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक ; जिपवर दिली धडक

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी आज जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन जिपच्या महिला व बालकल्याण अधिकारी इंगोले यांच्यामार्फत राज्य शासनाला पाठविले.
गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. असे असतानाही शासन अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्याचबरोबर पेन्शन देण्याच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे पेन्शनसह इतर मागण्या तत्काळ पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आज जिपसमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात विठाबाई भट, उज्वला उंदिरवाडे, अरूण भेलके, फकीरा ठेंगणे, ललीता केदार, सुशिला कार, भागीरथा दुधबावरे, कौशल्या गौरकार, सविता आत्राम, योगिता मुनघाटे, ज्योती बेजंकीवार, रंजना चौकुंडे यांच्यासह शेकडो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.