विद्यार्थ्यांनी नशिबाला दोष देण्यापेक्षा प्रयत्नवादी बना-नगराध्यक्ष जयश्री वायलालवार ; चामोर्शी पत्रकार समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्यार्थ्यांनी नशिबाला दोष देण्यापेक्षा प्रयत्नवादी बना-नगराध्यक्ष जयश्री वायलालवार ; चामोर्शी पत्रकार समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

GADCHIROLI TODAY

चामोर्शी : आजचे युग स्पर्धेचे आहे. युगात शैक्षणिक क्षेत्रात मोठी चढाओढ सुरू असून विद्यार्थ्यांना अपयश आले की नशिबाला दोष देत असतात ते दोष देत बसण्यापेक्षा प्रयत्नवादी बनले पाहिजे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यातूनच विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी संततीसाठी संपत्ती मिळवण्यापेक्षा संपत्ती मिळवणारी संतती घडवा असे प्रतिपादन नगराध्यक्ष जयश्री वायलालवार यांनी केले.
येथील पत्रकार समितीच्या वतीने मंगळवारी ११ जुलै रोजी सांस्कृतिक सभागृहात नगरसेवक व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ विठ्ठल चौथाले, प्रमुख अतिथी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बूरांडे , पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्यासह मार्कडा देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, निवृत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पी .जी.सातर, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, प्राचार्य रेव्ह फादर अगस्टीन, पोलिस उपनिरीक्षक सुधीर साठे, पिएसआय तुषार पाटील, महीला पोलिस उपनिरीक्षक पल्लवी वाघ, प्राचार्य जे. विलास ,उद्योजक किशोर दोषी, घनश्याम मनबत्तुलवार आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रजवलन करून करण्यात आली.उपस्थित मान्यवरांचां शाल शिफळ व पुष्पगुच्छ देऊन पत्रकार समिती पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अयाज शेख यांनी केले तर संचालन गजानन बारसागडे व आभार चंद्रकांत कुनघाडकर यांनी मानले .कार्यक्रमाला पालक विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी पत्रकार समितीचे उपाध्यक्ष बबन वडेट्टीवार, अयाज शेख, अमित साखरे, नरेंद्र सोमंनकर, प्रकाश घोगरे, , पुंडलिक भांडेकर किशोर बुरे, ज्ञानेश्वर गोहणे, तसेच जा. कृ. बोमनवार शाळेच्या स्काऊट पथकातील या विद्यार्थीनी सहकार्य केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे आई वडील उपस्थित होते.
दहावीतील गुणवंत विद्यार्थी : टिंकल बारसागडे, प्रियंका दुधबावरे, यश मेश्राम, प्रणय बुरांडे, पलक पिपरीकर, प्रिन्स वडेट्टीवार, साची सोनमंकर, नंदिता हलदर, व पत्रकार पाल्य इयाता १० वीची सृष्टी प्रकाश घोगरे लोकमान्य माध्यमिक विद्यालय मुरखळा (माल )

बारावीतील गुणवंत विद्यार्थी: प्रिया चलाख, नशा रामटेके, अंशुरांणी उंदिरवांडे, श्रेयस बोरकर, साक्षी मराठे, श्रावण बोधलकर, छकुली बडगे यांना पालकाच्या उपस्थित गौरव पुरस्कार, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
पत्रकार पाल्य : जयश्री बोबाटे ( कुनघाडकर) ही सन २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र शासनाची सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर
नगर पंचायतमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे स्वर्गरथ चालक उमाजी सोमनकर, अग्निशामक चालक राकेश वासेकर, स्वच्छता पर्यवेक्षक ऋषी गोरडवार या सर्वाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .
ध्येय ठेऊन वाटचाल करा-डॉ. विठ्ठल चौथाले
ध्येय ठेऊन त्यानुसार प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळत असते ध्येयाची ओढ असल्यास पावलांना आपोआपच गती मिळते आजचे युग स्पर्धेचे असून या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी नियोजनबध्द अभ्यास करा व स्वप्नाच्या पूर्ततेसाठी परिश्रम करण्याची गरज आहे असल्याचे सांगितले
गुणवंत विद्यार्थी राष्ट्राची संपत्ती -पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील
गुणवंत, कर्तबगार व सिद्धता असणाऱ्याचा सन्मान, गौरव करणे ही आपली संस्कृती आहे. त्या संस्कृतीला अभिप्रेत असणारा आजचा हा कार्यक्रम आहे. तो सामाजिक तेवढाच भावनीक सुध्दा आहे.१० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा हा त्यांना भावी उज्ज्वल वाटचालीकरीता ध्येय निर्माण करणारा आहे व अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा असून गुणवंत विद्यार्थी राष्ट्राची संपत्ती असल्याचे प्रतिपादन पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी केले.