मुसळधार पाऊसाची शक्यता ; उद्या जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

मुसळधार पाऊसाची शक्यता ; उद्या जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : हवामान विभागने जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केले असल्याने पुरस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा सीमाक्षेत्रातील सर्व शाळा, विद्यालय, अंगणवाडी, महाविद्यालये गुरुवार, 20 जुलै रोजी बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिले आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. तसेच पाणलोट क्षेत्रातील नद्या, नाल्यांना पुर आल्याने मुख्य मार्गासह अंतर्गत बंद होत आहेत. भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक कार्यालयाने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून वज्राघातासह मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शाळा, महाविद्यालये उद्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.