लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि लॉइड्स इनफिनाईट फाऊंडेशन तर्फे ३ शाळांत शैक्षणिक साहित्यांचे वाटप

मुसळधार पावसातही रंगला सोहळा

-लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट चा स्तुत्य उपक्रम

GADCHIROLI TODAY

चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रियदर्शिनी कन्या विद्यालय घुघुस, न्यू इंग्लिश स्कूल पांढरकवडा व इंदिरा गांधी विद्यालय पडोली या तीन शाळांमध्ये 18 व 19 जुलै रोजी लॉइड्स इनफिनाईट फाऊंडेशन आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण तसेच आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या शाळांमध्ये भौतिक सुविधांची पूर्तता झाल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून येत होता.
या उपक्रमा अंतर्गत तिन्ही शाळेतील 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, 12 नोटबुक, कंपास बॉक्स, आलेख वही, चित्रकला वही इत्यादी वस्तू देण्यात आल्या. सोबतच शाळेला सक्षम करण्याकरिता विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, कॉम्प्युटर लॅब या सर्व गोष्टी देण्यात आल्या. शैक्षणिक साहित्य आणि भौतिक सुविधांची पूर्तता झाल्याने तिन्ही शाळांतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि खास म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कमालीची ऊर्जा व उत्साह पाहायला मिळाला.
याप्रसंगी आर्थिक सहाय्य करणारे लॉइड्स मेटल या प्रकल्पाचे युनिट हेड संजय कुमार, वाईस प्रेसिडेंट प्रशांत पुरी, HR मॅनेजर पवन मेश्राम, CSR हेड नम्रपाली गोंडणे , लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे हेड ऑफ एज्युकेशन लसुधीरकुमार गजभिये, ASEP मॅनेजर कांचन थोरवे, कोऑर्डीनेटर मुकेश भोयर, स. कोऑर्डीनेटर रश्मी होले, मिलिंद काटकर, पायल राजपूत, सुमैय्या मिर्झा, आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला शाळांचे संस्थापक, सचिव, माजी मुख्याध्यापक यांनी हजेरी लावली. सोबतच मोठ्या प्रमाणावर पालक वर्गाने सुद्धा उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट च्या ASEP टीमसोबत तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.