अधिक श्रावण मासात मार्कंडेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

अधिक श्रावण मासात मार्कंडेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

GADCHIROLI TODAY
चामोर्शी : यंदा श्रावणातच अधिक मास आल्याने आठ श्रावण सोमवार आहेत, अशी संभ्रमावस्था सर्वत्र निर्माण झाली आहे. मात्र, शुध्द श्रावणातच सर्व व्रतवैकल्ये करायची असून श्रावण सोमवार चारच असले तरी तालुका मुख्यालयापासून अगदी जवळच असलेल्या मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर मंदिरात श्रावण अधीक मासात आज भाविकांची मोठी गर्दी दिसून आली/
चामोर्शी मुख्याल्यापसून जवळच असलेल्या वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले मार्कंडा देव येथील फार पुरातन व वैभवशाली संस्कृती साक्ष देणारा मार्कंडेश्वर मंदिर स्थळी चामोर्शी वरून दक्षिणेकडे वाहत असलेली वैनगंगा पिंपळघाट ते देवटोक या ठिकाणी उत्तर वहिनी होऊन पुन्हा नंतर दक्षिण मुखी झालेली आहे म्हणून ” उलटी गंगा” म्हणून या स्थळास धार्मिकतेचे विशेष स्थान म्हणून महत्व आहे. महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते, वर्षभर धार्मिक विधी कार्यक्रमासाठी राज्यासह बाहेर राज्यातील भाविक, श्रध्दाळू येत असतात, त्यामुळेच या ठिकाणी दररोज भाविकांची गर्दी असते. श्रावण अधिक मास मधील ३० जुलै रोजी रविवारी सकाळ पासूनच श्रध्दाळू भाविक शिवाचे दर्शनासाठी दाखल झाले होते. मुख्य मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर मंदिरा बाहेरील शिव पिंडिजवळ मंदिराचे पुजारी श्रीकांत महाराज पांडे यांच्याकडून मंत्रोच्चारात पूजा अर्चा करताना भाविकांनी गर्दी केली होती.
श्रावण अधिक मास मध्ये मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील प्रेमा गणपतराव पाटबोर या महीला भाविकांकडून मत जाणून घेतले असता त्यांनी सांगितले की, अधिक मास असल्याने गडचिरोलीत जावई असून त्यांना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले व मार्कडा येथील उत्तर वाहिनीस्थळी मार्कंडेश्वराचे दर्शन घ्यावे म्हणून या स्थळी परिवारासह आलोत. या धार्मिक स्थळी मार्कडेश्र्वराचे दर्शन झाले आम्ही धन्य झाल्याची भावना व्यक्त केली.